गणेश सजावट

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा

शहापूरमधील टेंभा गावात तुकाराम गोडबींदे यांच्या घरगुती गणपतीच्या सजावटीत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा देखावा साकराण्यात आलेला आहे.

Published by : Team Lokshahi

आज लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे. राज्यभरातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात लाडक्या गणपती बाप्पाची मोठ्या जल्लोषात प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेली आहेत. घरोघरी बाप्पा विराजमान झालेले आहेत तर देशभरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. मोठ मोठ्या मंडळांसोबतच प्रत्येकाच्या घरोघरी देखील बाप्पा विराजमान झालेले आहेत.

शहापूरमधील टेंभा गावात तुकाराम गोडबींदे यांच्या घरगुती गणपतीच्या सजावटीत अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचा देखावा साकराण्यात आलेला आहे. हा संपूर्ण देखावा इकोफ्रेंटली होता त्यामध्ये स्वामींच्या वटवृक्षाखाली बसलेले गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि तो वटवृक्ष कागदी लगदा, वर्तमानपत्र, वॉटरकलर आणि लाकडी भुसा वापरून बनवलेला आहे. दत्तगुरु आणि स्वामींनी कुठे कुठे वास्तव्य केले याची माहिती ही या देखाव्यात देण्यात आली आहे.

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news